बैल पोला खतरनाक झड्ती 2023. झडती 2023, मराठी झडती 2023 , बैल पोला झडती 2023
बैलाविषयी कृतज्ञता व्यक्त करणारा सण म्हणजे पोळा. शेतकऱ्याची व्यथा पोळ्याच्या दिवशी गाण्याच्या झडत्यातून व्यक्त होते. पूर्व विदर्भात यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, नागपूर, भंडारा या जिल्ह्यात पोळ्याच्या दिवशी मैदानात ‘झडत्यांचा’ मुकाबला चांगलाच रंगतो. पोळा सणात बैल, नंदीसाठी म्हटलेल्या गीतांना झडत्या असे म्हणतात. हा लोककलेतील काव्यप्रकार. गावातील लोकच झडत्यांची निर्मिती करतात. झडत्या वाचण्यापेक्षा त्याचं सादरीकरण मनोरंजक ठरतं. विशिष्ट लयीत बैलांच्या साक्षीने झडत्या सादर होतात.
दरवेळी पोळ्याला झडत्यांचा विषय बदलतो. वर्तमानातील समस्या, राजकारण, व्यक्ती, महागाई, भ्रष्टाचार यावर झडत्यांमधून व्यंगात्मक टीका केली जाते. गेली तीन वर्षे झडत्या पीएम, सीएम यांना केंद्रस्थानी ठेवून झडल्या जात आहेत. यावर्षी पीककर्ज माफी, नोटबंदी, जीसटी, दुष्काळ हे विषय झडत्यांच्या केंद्रस्थानी आहेत. झडत्यांच्या माध्यमातून शेतकरी आपल्या मनातील वेदनेला व्यंगातून व्यक्त करतात.
शेतकर्यांचे वैभव असलेला बैलांचा दिवस म्हणजे पोळा. वर्षभर राबणार्या बैलांची पिठोरी अमावश्येच्या दिवशी पूजा करून कृतज्ञता व्यक्त करणारा पोळा हा सण उत्साहाने साजरा केला जातो. पोळ्याच्या आदल्या दिवशी बैलांच्या खांदे शेकणीचा कार्यक्रम असतो.लांचे खांदे तूप किंवा तेल, हळद लावून शेकतात.
'आज आवतन घ्या अन् उद्या जेवायला या' या शब्दात बैलांना पोळ्याचे आमंत्रण दिले जाते.
1) आभाळ गडगडे
विजा कडकडे
सरकारात घुसले रेडे
इकडे कास्तकार झाले
कर्जापायी येडे
अन आमदार खासदार खाते
मलाईचे पेढे
एक नमन गौरा पार्वती हर बोला हर हर महादेव
2)चाकचाडा बैलगाडा
बैल गेले हो गोहाटीला
गोहाटीहून आणले खोके
मग देवेन्द्राने लावले डोके
एका नाथाने मारली कलटी
अन उद्धवभाऊले देल्ली पलटी
एक नमन गौरा पार्वती हर बोला हर हर महादेव
3) फुटला रे फुटला
उद्धवचा पोळा
पन्नास झाले आमदार
एकनाथपाशी गोळा
शरद म्हणे तुम्ही
खेळू नका रडी
आम्ही खाऊ कितीबी
तरी लावू नका ईडी
संजय माझा चेला
अन मी त्याचा गुरु
ईडीबिडी सापशिडी
नका करू सुरु
एक नमन गौरा पार्वती हर बोला हर हर महादेव
4) कांदा रे कांदा,
अकलेचा कांदा
काँग्रेसनेच केला हो
राहुलचा वांदा
मग आल्या प्रियांका,
त्यायनं फुकला बिगुल
मग होती नोती थेयबी
हवा झाली गूल
एक नमन गौरा पार्वती हर बोला हर हर महादेव
5) चाकचाडा बैलगाडा,
बैल गेला पवनगडा
पवनगडाहून आणली माती
थे दिली गुरूच्या हाती
गुरूने बनविली चकती
दे माझ्या बैलाचा झाडा
मग जा आपल्या घरा
एक नमनगौरा पार्बती हरहर महादेव…..!
6) आभाळ गडगडे,
शिंग फ़डफ़डे
शिंगात पडले खडे
तुझी माय काढे
तेलातले वडे
तुझा बाप खाये पेढे .
एक नमनगौरा पार्बती हरहर महादेव…..!
7) गणा रे गणा, गण गेले वरच्या राणा
वरच्या राणातून आणली माती
ते देल्ली गुरूच्या हाती
गुरूनं घडविला महानंदी
ते नेला हो पोळ्यामंदी,
एक नमन गौरा पारबती हरऽऽ बोला हरऽऽ हर ऽऽ महादेव
8) वाटी रे वाटी खोबऱ्याची वाटी,
महादेव रडे दोन पैश्यासाठी,
पार्बतीच्या लुगड्याले छप्पन गाठी,
देव कवा धावल गरिबांसाठी,
एक नमन गौरा पर्बती हरबोला हर हर महादेव.....
9) 'वाटी रे वाटी खोबर्याची वाटी,
महादेव रडे दोन पैशासाठी,
पारबतीच्या लुगड्याले छप्पन गाठी,
देव कवा धावला गरिबांसाठी'
एक नमन गोरा पार्वती,
हर बोला हर-हर महादेव'.
10) अभाय गडगडे शिंग फडफडे
जो तो जाये काँन्वेंटकडे
मराठी वाचतानी अडखडे..
तरी त्याचं ध्यान इंग्रजीकडे
अगाऊ कामानं मास्तर होये वेडे
त्यायलेच पहा लागते खिचडीतले किडे.....
कोणत्याही कामात मास्तरलेच ओढे....
बिना कामाच्या कामानं मोडे कंबरडे....
एक नमन गौरा पारबती हरबोला महादेव.
11) वसरी रे वसरी, शम्याची वसरी,
पयलीले लेकरू, नाई झाल,
मनुन श्यान ‘केली होदुसरी’ !!१!!
दुसरीच्या लग्नात वाजवला बीन,
जनता डोल्ली, म्हणे हो ‘आयेगे अच्छे दिन’ !!२!!
इकास जन्माले याची ‘वाट पाहून रायली जनता’
सरकारण देल्ला हो, ‘नोट बंदीचा दनका’ !!३!!
एक नमनगौरा पार्वती हर बोला हर हर महादेव...!
12) पोई रे पोई,,पुरणाची पोई !!
मुख्यमंत्र्यान देल्ली हो,
कर्ज माफीची गोई !!
त्या गाईले चव ना धव,
कास्तकाराचं आस्वासनात,मराच भेव!!
रकुन आला कागुद, तीकुन आला कागुद,
आश्वासनावर,कास्तकार बसला
जिवमुठीत दाबून !!
एक नमनगौरा पार्वती हर बोला हर हर महादेव...!
13) चक चावळा, बैल पावळा
बैल गेले हो पोंगळा.
पोंगळ्याची आणली माती,ते देली हो अंबाणीच्या हाती.
अंबानीन घडवला हो मोदी नंदी.
त्या मोडीनंदी न केली हो नोटबंदी
त्या नोटबंदी आणली हो मंदी.
एक नमनगौरा पार्वती हर बोला हर हर महादेव..
आशा करता हु आपको आजका ये लेख पसंद आया होगा.अगर पसंद आता है तो आप कमेंट करके जरुर बताये धन्यवाद

0 Comments